सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कितीतरी गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. लेखकाने तंत्रज्ञानाचा वाढता वापर, संवादहीनता, प्रत्येक गोष्टीकडे 'ट्रेंड' म्हणून बघण्याची वृत्ती, संपुष्टात येत चाललेली माणुसकी, या आणि अशा अनेक गोष्टींवर व्यंगात्मक स्वरूपात या पुस्तकात भाष्य केले आहे. आजच्या मराठी साहित्यातली ही एक प्रायोगिकता आहे.