शर्यत जशी नावावरूनच कळते तशीच बैलगाडा शर्यतीबद्दल जमिनीवर जाऊन इतका सखोल अभ्यास करून लिहिलेली कदाचित ही पहिलीच कादंबरी असेल. बैलगाडा शर्यतीवरती आलेली बंदी, त्याअगोदरचा काळ, बंदीचा काळ आणि त्यानंतर झालेले बदल; याचं वर्णन लेखकांनी अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने केलेलं आहे .एक स्वप्न उराशी बाळगून ते जगणं आणि त्याला पूर्ण करणं किती थरारक असू शकतं, हेच नायकासोबत अनुभवणं म्हणजे, शर्यत ही कादंबरी! हे पुस्तक वाचताना वाचक स्वतः कधी एकरूप होऊन जातो आणि बैलगाडा शर्यत जिंकणं हे आपलं पण स्वप्न होऊन जातं हे कळत नाही. एक एक पात्र आणि कथा अशी वेगळी भासते आणि नंतर धागा धाग्याशी जुळतो त्याप्रमाणे विण बनते आणि सुदंर शाल, किंवा रेशमी शेला विणून तयार होतो तशी कथा उमगते.